अतिवेगवान रेल्वेसेवा चीनमध्ये सुरु

0
12

चीनने जगातील सर्वाधिक वेगवान बुलेट ट्रेन ‘फुक्शिंग’ची सेवा सुरू केली. ही रेल्वे बीजिंग ते शांघायदरम्यान धावणार असून या प्रवासात याचा वेग 350 ते 400 किलोमीटर प्रतितास एवढा अधिक असेल.

‘फ्युशिंग’ ट्रेन 

चीनमधील हि जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बीजिंग ते शांघाय अशा दोन महत्वाच्या शहरांना जोडणार आहे. दोन्ही शहरांमधील 1318 किलोमीटरचे अंतर ही रेल्वे केवळ 4.30 तासात गाठेल. ३५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारी हि बुलेट ट्रेन दोन्ही शहरामधील १,२५० किलोमीटरचं अंतर अवघ्या साडेचार तासात पार करेल. ‘फ्युशिंग’ असं या ट्रेनचे नाव आहे. 

चीनमध्ये सहा वर्षांनंतर इतक्या वेगाने पुन्हा एकदा बुलेट ट्रेन धावते आहे. याआधी ताशी ३०० किलोमीटरच्या वेगाने ट्रेन धावायच्या. पण २०११मध्ये झालेल्या अपघातात ४० लोकांचा मृत्यू झाला होता तर १९० लोक जखमी झाले होते. त्यामुळे बुलेट ट्रेनचा वेग कमी करण्यात आला. जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर ट्रेनचा वेग आपोआप कमी होणार आहे. यापूर्वी शांघाय ते बीजिंग अंतर कापण्यासाठी सहा ते साडेसहा तासांचा अवधी लागायचा. परंतु, हा वेळ आता दीड तासाने घटणार आहे. या ट्रेनचं आयुष्य फक्त ३० वर्षांचं असणार आहे.