“अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

0
273

1 ऑक्टोंबर 2018 रोजी मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र, औरंगाबाद येथे अण्णाभाऊ साठे यांच्या ‘विचारांची ओळख व त्यांच्या साहित्यावर संशोधन व्हावे या उद्देशाने ‘सत्यशोधक अण्णाभाऊ साठे : एक मानवतावादी साहित्यीक’ या विषयावर एक दिवसीय आंतरविद्याशाखेच्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर व विचारांवर प्रकाश टाकण्यासाठी साहित्यीक तथा विचारवंत डॉ.शरद गायकवाड हे बिजभाषक म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या परिसंवादात बोलण्यासाठी डॉ.बळीराम गायकवाड,डॉ.प्रमोद गारोडे डॉ.लक्ष्मण जोगदंड, डॉ.गणेश मोहीते व डॉ.विष्णू पाटील यांचा सहभाग असणार आहे.