‘अटल आयुषमान उत्तराखंड’ योजनेचा शुभारंभ

0
348

उत्तराखंड या डोंगराळ राज्यात ‘अटल आयुषमान उत्तराखंड योजना’ याचा शुभारंभ करण्यात आला आहे. ही योजना भारत सरकारच्या ‘आयुषमान भारत’ योजनेच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आली आहे.

‘अटल आयुषमान उत्तराखंड योजना’ या योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 5 लक्ष रूपयांपर्यंत वैद्यकीय उपचार सेवा दिली जाणार. या योजनेमुळे 23 लक्ष कुटुंबांना फायदा होईल. या योजनेच्या अंतर्गत 1,350 आजारांचा समावेश केला जाणार आहे. 

आयुषमान भारत – राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा मोहीम (AB-NHPM) 

ही भारत सरकारकडून वित्तपुरवठा होत असलेली जगातली सर्वांत मोठी आरोग्य सुरक्षा विषयक योजना ठरली आहे. 

योजनेचे स्वरूप –

योजनेच्या अंतर्गत द्वितीय आणि तृतीय श्रेणीतले वैद्यकीय उपचार घेण्यासाठी वर्षाला प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपये याप्रमाणे 10 कोटी गरीब व वंचित कुटुंबांसाठी अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेसाठी लागणार्‍या निधीचा 40% वाटा राज्यांमधून येणार आहे. केंद्र सरकार या आरोग्य योजनेसाठी दरवर्षी 5,500 ते 6,000 कोटी रुपये खर्च करणार.

आरोग्य केंद्रांवर सामान्य आजारांसाठी मोफत औषधी उपलब्ध करून दिली जाणार. या केंद्रांवर देशी वैद्यकीय पद्धतींवर भर दिला जाणार आहे. या केंद्रांवर योग संबंधी प्रशिक्षणासोबतच युनानी, आयुर्वेद आणि सिद्ध पद्धती संबंधी उपचार उपलब्ध असतील. ह्रदयरोग, मूत्रपिंड आणि यकृताचे विकार आणि मधुमेह यासारख्या 1,300 हून अधिक आजारांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. 

योजनेमधून 2,500 आधुनिक रुग्णालये द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांमध्ये उभारले जाणार आहेत. देशभरातली 13,000 रुग्णालये या योजनेचा भाग बनलेली आहेत. शिवाय देशात 1.5 लक्ष कल्याणकारी केंद्रे (wellness centers) तयार केली जाणार आहेत.