अग्नी २ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

0
22

भारताने 29 फेब्रुवारीला ‘अग्नी-2’ या मध्यम वर्गात मोडणाऱ्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केली आहे. ओडिशामधल्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी घेण्यात आली. एकात्मिक चाचणी क्षेत्राच्या चौथ्या संकुलामधून मोबाइल लाँचरच्या सहाय्याने ही चाचणी घेण्यात आली.

अग्नी-2 वैशिष्ठ्ये :

# हे क्षेपणास्त्र 20 मीटर लांबीचे असून त्याचे वजन 17 टन इतके आहे.

# एक टनापर्यंत वहनक्षमता असलेल्या अग्नी-2 चा मारा पल्ला 2000 किलोमीटर इतका आहे.

# हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.

# भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) च्या अॅडवांस्ड सिस्टम्स लेबोरेटरीने विकसित केलेल्या ‘अग्नी’ या मालिकामधले हे क्षेपणास्त्र आहे.

# क्षेपणास्त्राला एकात्मिक पथदर्शी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम (IGMDP) अंतर्गत तयार केले गेले आहे.

# हे दोन टप्पे असलेले क्षेपणास्त्र आहे. यामध्ये इंधनासाठी घन इंधन वापरण्यात आले आहे.

# यामध्ये हाय-अॅक्युरेसी नेव्हिगेशन सिस्टम बसविण्यात आले आहे.

स्वदेशी ‘अग्नी’ या क्षेपणास्त्राच्या मालिकेमध्ये आतापर्यंत मारा करण्याच्या पल्लानिहाय 5 प्रकार विकसित करण्यात आले आहेत. 

  • अग्नी 1 – 700 किलोमीटरचा मारा पल्ला
  • अग्नी 2 – 2000 किलोमीटरचा मारा पल्ला
  • अग्नी 3 – 3000 किलोमीटरचा मारा पल्ला
  • अग्नी 4 – 4000 किलोमीटरचा मारा पल्ला
  • अग्नी 5 – 5000 किलोमीटरचा मारा पल्ला