अखिल भारतीय व्याघ्र अंदाज अहवाल 2018 जाहीर करण्यात झाला

0
105

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक व्याघ्र दिन 29 जुलैच्या प्रसंगी व्याघ्रगणनेची घोषणा केली.

• अखिल भारतीय व्याघ्र अंदाज अहवाल 2018 नुसार भारतात 2,967 वाघ आहेत, जे 2014 च्या तुलनेत तिसऱ्या भागाने अधिक आहेत.

प्रमुख निष्कर्ष :

• शीर्ष 5 चांगली कामगिरी करणारे राज्ये : मध्य प्रदेशात वाघांची सर्वाधिक संख्या 526 आहे, त्यानंतर कर्नाटक (524), उत्तराखंड (442), महाराष्ट्र (312) आणि तामिळनाडू (264).
• वाघांची संख्या कमी होणारी राज्ये : छत्तीसगड आणि मिझोरम.
• इतर सर्व राज्यांमध्ये सकारात्मक वाढ पाहण्यात आली.
• वाघांची सर्वाधिक संख्या असलेले स्थान – मध्य प्रदेशमधील पेंच व्याघ्र प्रकल्प
• 2014 पासून व्याघ्रवस्तीत जास्तीत जास्त सुधारणा असलेले स्थळ – तामिळमधील सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प

व्याघ्र प्रकल्पचे व्यवस्थापन कार्यक्षमता मूल्यांकन (MEETR) चे 4 वे चक्र :

• भारतातील 50 व्याघ्र प्रकल्पांचे मुल्यांकन करणारा हा अहवाल चौथ्या राष्ट्रीय व्याघ्र अंदाज (टायगर) सोबत जाहीर करण्यात आला.
• त्यानुसार – पेंच अभयारण्य (एमपी) आणि केरळचे पेरियार अभयारण्य यामध्ये पूर्ण देशात वाघांचे उत्तम व्यवस्थापन आहे.
• सर्वोत्तम कामगिरी केलेल्या राज्यांनी 93.75% गुण मिळवले.
• दांपा रिझर्व्ह (मिझोरम) आणि राजाजी रिझर्व्ह (उत्तराखंड) हे अनुक्रमे 42.97% आणि 44.53% गुणांसह सर्वात खालच्या स्थानी राहिले.
• या सर्व क्रमवारीत राखीव व्यवस्थापनात छत्तीसगढ हे सर्वात खालचे राज्य म्हणून जाहीर करण्यात आले.

कार्यपद्धती :

• देशातील सर्व अभायारण्यांना 5 भौगोलिक समूहांमध्ये विभागले गेले.
• पश्चिम घाट समूहात केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांनी 81% सरासरी गुण प्राप्त केले.
• 75% आणि त्यावरील गुणला ‘खूप चांगले’ अशी श्रेणी आणि 41% आणि त्यावरील गुणाला ‘फेअर’ म्हणून चिन्हांकित केले आहे.

चौथा राष्ट्रीय व्याघ्र अंदाज (व्याघ्र गणना) :

• 2006 पासून हा वाघांचे चौथा अखिल भारतीय सर्वेक्षण आहे. हे खूपच बारीक माहिती गोळा करणारे कार्य असून 4 वर्षातून एकदा ही गणना घेतली जाते.
• ताज्या सर्वेक्षणात मागच्या 15 महिन्यात (1.3 वर्ष) वन अधिकाऱ्यांनी गोळा केलेली माहिती ठेवण्यात आली आहे. यात अधिकाऱ्यांनी 3,81,400 चौकिमी जंगल वसाहतीत 26,760 कॅमेरा सापळे आणि वन्यजीव शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन 35 दशलक्ष प्रतिमांवरून लावलेले निष्कर्ष ठेवण्यात आले आहेत.
• जवळजवळ 83% वाघांची संख्या या प्रतिमांमध्ये पकडली गेली आहे असा अंदाज आहे.