अखिल भारतीय रेल्वे कुस्ती स्पर्धेत विक्रम कुराडेला सुवर्ण

0
17

महाराष्ट्राच्या विक्रम कुराडे याने लक्षवेधी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावताना 59व्या अखिल भारतीय रेल्वे कुस्ती अजिंक्‍यपद स्पर्धेवर वर्चस्व गाजविले.

महाराष्ट्राच्या विक्रम कुराडे याने लक्षवेधी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावताना 59व्या अखिल भारतीय रेल्वे कुस्ती अजिंक्‍यपद स्पर्धेवर वर्चस्व गाजविले. उदयपूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेतील ग्रीको रोमन विभागातील 60 किलो वजनी गटातील अंतिम फेरीच्या लढतीत महाराष्ट्राच्या विक्रम कुराडेने सुरेंद्र याचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

विक्रम कुराडे

राष्ट्रीय विजेता असलेला कोल्हापूरचा विक्रम हा सध्या कोल्हापूर येथे शहाजी कॉलेजमध्ये बीएच्या तिसऱ्या वर्षाला शिकत असून मध्य रेल्वेच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा एक घटक आहे. तसेच विक्रम कुराडेला लक्ष्य व नांदेड सिटी यांचा पाठिंबा लाभला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विक्रम कुराडेला पसंती देण्यात येत आहे तसेच 2020मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतही तो खेळणार असल्याची शक्‍यता आहे.