अँड्राइड ऑरिओ

0
22

गुगलने अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टिमची नवीन आवृत्ती अँड्राइड-ओ कोला अधिकृतपणे लॉंच केले आहे. त्याला ऑरियो असे अधिकृतपणे नाव दिले आहे.

गुगलने काही दिवसांपूर्वी अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टिमची नवीन आवृत्ती अँड्राइड-ओ कोला अधिकृतपणे लॉंच केले आहे. त्याला ऑरियो असे अधिकृतपणे नाव दिले आहे. या खास नवीन अँड्राइड व्हर्जनमध्ये नवनवीन फीचर्स असून त्याचा वापर हा यूजरला अधिकाधिक अनुभवी बनवणारा आहे.

अँड्राइड ऑरिओ हे तांत्रिक पातळीवर ऑपरेटिंग सिस्टिमचे 8.0 व्हर्जन आहे. या ऑपरेटिंग सिस्टिमच्या मदतीने कोणत्याही व्हिडिओला दुसऱ्या अॅपच्या एका लहान विंडोंमध्ये रिसाइज करू शकतो आणि पाठवूही शकतो. याशिवाय मित्रांसमवेत चॅटिंग करतानाही व्हिडिओ पाहता येणे शक्‍य होणार आहे.

पिक्‍चर इन पिक्‍चर – एखादा व्हिडिओ पाहताना त्यास फ्लोटिंग विंडोजमध्येदेखील कोठेही स्क्रिनवर सेट करू शकतो. याशिवाय दोन व्हिडिओदेखील एकाचवेळी पाहता येणे शक्‍य होणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही अॅपबरोबर इंटरॅक्‍ट करताना व्हिडिओ प्ले करता येणार आहे. विशेष म्हणजे व्हिडिओ बंद न करताच होम पेजवर जाऊन व्हिडिओबरोबर मल्टी टास्किंगसुद्धा करू शकतो.

ऑटो फिलची सुविधा – ऑटो फिलचे नाव ऐकून हे फीचर कसे असेल, हे समजले असेल. अँड्राइड-ओ ईमेल आयडी तयार करण्यासाठी किंवा कोणतेही ट्रांझॅक्‍शन आयडी तयार करण्यासाठी यूजरला वारंवार आपली माहिती भरावी लागणार नाही आणि पुढच्या वेळी त्याचा वापर करताना ते ऑटोफिल होईल. जर यूजर एखादा पासवर्ड मॅनेजरचा अॅप वापरत असेल तर तो यूजरला अँड्राइड-ओ डिव्हाइसवर ऑटोफिलच्या माध्यमातून सहजपणे सुरक्षित पोचवतो.

बॅटरी लाइफ – गुगल अँड्राइड फोनसाठी बॅटरी नेहमीच फीचरचे काम करत आले आहे. डॉज मोडनंतर ऑरिओत बॅटरी बॅकअप आणि सुरक्षितता लक्षात घेऊन व्हायटल फीचरची सुविधा प्रदान केली आहे. ही सुविधा ऑपरेटिंग सिस्टिममध्ये सुरक्षा आणि त्याच्या ऑप्टिमायजेशनला योग्य रीतीने चालवण्यासाठी मदत करते. याशिवाय त्याच्या मदतीने फोनमध्ये असलेले सर्व अॅप्स स्कॅन करून यूजर हा अॅप्सची ऑथेंटिसिटी ओळखू शकतो.

नोटिफिकेशन चॅनेल्स – नोटिफिकेशन चॅनल्समध्ये यूजर अॅपच्या हिशेबाने नोटिफिकेशन स्टोअर करू शकतात आणि त्यानुसार रिंगटोन बदलू शकतो. जर यूजर सततच्या नोटिफिकेशनने हैराण झाला असेल तर ऑरिओने यासाठी एक पर्याय दिला आहे. यूजर नोटिफिकेशन्सला स्नूज करू शकतो आणि स्नूजसाठी वेळेची मर्यादादेखील निश्‍चित करू शकतो.

टेक्‍स्ट सिलेक्‍शन स्मार्ट – या नवीन फीचरला बेस्ट टेक्‍स्टिंग फीचर म्हटले जाते. स्मार्ट टेक्‍स्ट सिलेक्‍शनमध्ये यूजर फोनमध्ये केवळ फिंगर टचच्या माध्यमातून आपल्या गरजेप्रमाणे टेक्‍स्ट सिलेक्‍ट करू शकतो. स्मार्ट टेक्‍स्ट सिलेक्‍शनच्या फीचरमध्ये ऍड्रेस, व्यवसायाचे नाव आणि अन्य माहितीला ऑटोमेटिकली सिलेक्‍ट करून टेक्‍स्ट तयार करता येते.

इस्टंट अॅप्स – या ऑपरेटिंग सिस्टिम्समध्ये कोणताही अॅप इन्स्टॉल न करता थेट ब्राउजरच्या माध्यमातून अॅपचा वापर करू शकता. अशा स्थितीत मोबाईलची मेमरी वाचते. कारण, अनेकदा केवळ एकदाच वापरण्यासाठी अॅप डाउनलोड करतो आणि तो अनेक अॅप वापराविना राहतो. अर्थात, याचा सपोर्ट निवडक अॅप्समध्येच दिला आहे.

नवीन इमोजी – यूजर इमोजी वापरतातच. आता या नवीन व्हर्जनमध्ये नवीन इमोजी दाखल झाले आहेत. गुगलने 60 नवीन इमोजी जोडले आहेत. याशिवाय जुने इमोजी नव्या पद्धतीने, आकारात सादर केले आहेत.