अँडी राजोलीना यांची मेडागास्करचे नवे राष्ट्रपतीपदी नेमणूक

0
258

दि. 19 जानेवारी 2019 रोजी अँडी राजोलीना यांनी मेडागास्कर या देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.

अँडी राजोलीना यांनी मेडागास्कर या देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. स्वातंत्र्यानंतर आफ्रिकेमधील या देशाच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा निवडलेल्या दोन राष्ट्रपतींदरम्यान लोकशाही सत्तेचे हस्तांतरण झाले आणि शांततेने पदाची जबाबदारी दुसर्‍याला सोपविण्यात आली.

मेडागास्कर (ऊर्फ मादागास्कर) हा आग्नेय आफ्रिका भागाच्या सागरी तटापासून जवळच असलेला एक मोठा बेट राष्ट्र आहे. अंटानानॅरिवो हे देशाचे राजधानी शहर आहे. मालागासी अरीरी हे राष्ट्रीय चलन आहे.