अँजेला मर्केल चौथ्यांदा जर्मनीच्या चॅन्सेलर

0
15

जर्मनीच्या चॅन्सेलरपदी चौथ्यांदा निवडून येत अँजेला मर्केल यांनी जर्मनीवरील आपल्या निर्विवाद वर्चस्वावर शिक्कामोर्तब केले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी मोठा विजय मिळवला.

अँजेला मर्केल

जर्मनीच्या चॅन्सेलर, कन्झर्वेटिव्ह ख्रिश्चन युनियनच्या नेत्या अँजेला मर्केल यांनी निवडणुकीत सलग चौथ्यांदा विजयी होण्याचा बहुमान सोमवारी मिळवला; परंतु इस्लामविरोधी, स्थलांतरविरोधी अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी या उजव्या विचारसरणीच्या पक्षाने संसदेत प्रवेश मिळवला असल्याने त्यांच्या विजयावर सावट पडले असल्याचे मानले जात आहे.मर्केल चौथ्यांदा विजयी झाल्या असल्या, तरी संपूर्ण बहुमत मिळवण्यात मर्केल यांचा पक्ष अपयशी ठरला आहे.

६३ वर्षांच्या मर्केल या जागतिक पातळीवर खंबीर आणि प्रभावशाली नेत्या म्हणून ओळखल्या जातात. २०१५ पासून त्यांच्या लोकप्रियतेमध्ये सातत्याने वाढ झाल्याचे समोर आले आहे. सोशल डेमॉक्रेट पक्षाच्या उमेदवारांनी मर्केल यांच्या पक्षाला चांगलीच टक्कर दिली. या पक्षाचे मार्टिन शुल्झ यांनी २० ते २१ टक्के मते मिळवली असून, हा पक्ष देशातील दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारा पक्ष ठरला आहे.

चार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या पक्षाची स्थापना फ्रेंच नॅशनल फ्रंट आणि ब्रिटनच्या ‘युकिप’पासून प्रेरणा घेऊन झाली. या पक्षाला जर्मनीतील कम्युनिस्ट विचारसरणीच्या लोकांनी मोठा पाठिंबा दिला. लिबरल फ्री डेमॉक्रेट्सला सुमारे १० टक्के मते मिळाली आहेत.
 
अँटी कॅपिटलिस्ट (डावे) आणि इकॉलॉजीस्ट ग्रीन या दोन पक्षांना ९ टक्के मते मिळाली आहेत. पक्षाला विजय मिळाला असला, तरी पक्षाला जी मते मिळणे अपेक्षित होती, त्यात होती त्यात ४० टक्के घट झाल्याची कबुली मर्केल यांनी दिली आहे. या मतांना पुन्हा आपल्या पक्षाकडे खेचून आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.